Mtskpy solar pump ; मागेल त्याला सौर कृषीपंपा साठी अर्ज सूरु
Mtskpy solar pump ; शेतकऱ्यांची सोलार पंपासाठी मोठी मागणी असुन सौर पंप असल्यास रात्रीबेरात्री सिंचन करण्याची गरज राहत नाही. रात्री पिकांना सिंचन करण्यात अनेक दुर्घटना घडतात अनेक भागात जंगली जनावराची भिती असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला सोलार पंप मिळावा अशी अपेक्षा असते . राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे मागेल त्याला सोलार पंप योजना (Magel Tyala Solar Pump) सुरू करण्यात आली. दि. 13/सप्टेंबर 2024 रोजी या योजनेसाठी नवीन अर्ज सुरू केले असून या योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने 08 लाख 50 हजार सौर पंपांचे वितरण करण्यात येणार आहे. (Maharashtra government scheme solar pump yojna 2024)
राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास अवाहन केले आहे. सौर पंपासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन सादर करावेत. तसेच मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन करावेत. (मागेल त्याला सौर पंप नवीन पोर्टल लिंक )
https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज सुरू या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार
शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणत्याही योजनेंतर्गत सौरपंपाचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना मागेल सौरपंप योजनेचा लाभ मिळणार आहे.जर तुम्ही कुसुम सौर पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि महावितरणच्या माध्यमातून सौर पंपाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नाही. (Solar pump updates 2024-25)
Mtskpy solar pump मागेल त्याला सोलर पंपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून इच्छुक शेतकऱ्यांना लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस तुम्ही YouTube video मध्ये पहा. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि शेतीविषयक नवनवीन माहिती, तज्ञांचे हवामान अंदाज, बाजारभाव, शासकीय योजनाची माहिती व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा.