Nuksaan bharpaai केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला मिळाले 1492 कोटी रुपयाची मदत
Nuksaan bharpaai यंदा संपूर्ण देशात अती मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. सततच्या पावसामुळे महाराष्ट्र, आसाम, मिझोराम, केरळ आणि गुजरातसह इतर राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली होती. ही मदत आता जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दि. 01/ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपये मिळाले आहेत. या निधी वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 हजार 492 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच शेतकऱ्यांचा उल्लेख अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी कोणत्याही संकटात शेतकरी आणि राज्याच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले आहे, असे सांगत शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
केंद्राकडून कोणत्या राज्यांना किती मदत?
महाराष्ट्रानंतर केंद्र आंध्र प्रदेश: 1036 कोटी, आसाम: 716 कोटी, बिहार: 655.60 कोटी, गुजरात: 600 कोटी, हिमाचल प्रदेश: 189.20 कोटी, केरळ: 145.60 कोटी, मणिपूर: 50 कोटी. क्रोटी, मिझोराम: 21.60 कोटी, नागालँड: 19.20 कोटी, सिक्कीम: 23.60 कोटी, तेलंगणा: 416.80 कोटी, त्रिपुरा: 25 कोटी आणि पश्चिम बंगाल: 468 कोटी रुपयांचा निधी केंद्राने पुरग्रस्तांना वितरित केला आहे.