Nuksaan bharpaai ; ऑगस्ट सप्टेंबर मधिल नुकसानीची या तीन जिल्ह्यांना 987 कोटी मदत…
Nuksaan bharpaai ; मराठवाड्यात ऑगस्ट च्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मदतीचा निर्णय घेतला असून मदत वितरणाचे आदेश दिले आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बीड, परभणी आणि लातूर या तीन जिल्ह्यासाठी 987 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय आयुक्त यांच्याकडून मिळालेल्या नुकसान भरपाईच्या आकडेवारीनुसार या तीन जिल्ह्यासाठी 987 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पुर यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 997 कोटी रुपये निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली होती.
जिल्हानिहाय मदत खालील प्रमाणे
यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या तीन जिल्ह्यांत नुकसान झालेल्या 04 लाख 42 हजार 447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 06 लाख 09 हजार 579 शेतकऱ्यांना 603 कोटी 43 लाख 95000 रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.