Panjab dakh live ; राज्यात उघडीप परंतु पुन्हा पाऊस पंजाबराव डख
Panjab dakh live ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज शेतकऱ्यांना नवीन अंदाज वर्तवला आहे. नवीन अंदाजानुसार राज्यातील हवामान कोरडे असून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाहुया पंजाबराव डख पावसा बाबत काय म्हणतात…
पंजाबराव डख यांनी आज (दि.29/सप्टेंबर) रोजी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 05/ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहिल तसेच 06/ऑक्टोंबर पासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 06/ऑक्टोंबर पर्यंत उघडीप राहुन स्थानिक वातावरण निर्माण होऊन भाग बदलत पावसाची शक्यता असेल तरी सोयाबीन काढणी मळणी करताना शेतकऱ्यांनी स्थानिक वातावरणा नुसार नियोजन करावे. 06/ऑक्टोंबर पासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी, मळणी करताना वातावरणानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. (पंजाबराव डख लाईव्ह)