Panjab dakh live ; आजपासून पावसाला सुरुवात होणार – पंजाबराव डख

Panjab dakh live ; आजपासून पावसाला सुरुवात होणार – पंजाबराव डख

 

Panjab dakh live ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 21/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आजपासून 02/ऑक्टोबर पर्यंत पाऊस सूरु राहिल तरी सर्व शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहुन पुढील नियोजन करावे असे डख यांनी म्हटले आहे.

 

पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या अंदाजात म्हटले की सध्या नांदेड लातूर या भागात पावसाला सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळ पर्यंत महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाऊस सक्रिय होईल. तसेच 02/ऑक्टोंबर पर्यंत पासून सुरू राहील तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकाला व्यवस्थित झाकून ठेवावे म्हणजे नुकसान होणार नाही असे डख यांनी सांगितले आहे.

राज्यातील अनेक धरणे जवळपास 100% भरली आहे आणि आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तरी धरणातील पाण्याचा विसर्ग होईल तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा डख यांनी दिलाय. 21/सप्टेंबर ते 02/ऑक्टोबर या कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

 

01/सप्टेंबर, 02/सप्टेंबर रोजी राज्यात ज्याप्रमाणे पाऊस पडला होता तसाच पाऊस आजपासून 02/ऑक्टोबर या कालावधीत होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. 15/सप्टेंबर नंतर येणाऱ्या पावसात विजा आणि वारे अधिक प्रमाणात असते तरी विजा चमकत असताना झाडाखाली बसु नये असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

 

पंजाबराव डख यांचा YouTube video येथे पहा…

 

Leave a Comment