Pikvima 2023 news ; या जिल्ह्यात पिकविमा वाटप सुरू तुम्हाला मिळाला का चेक करा…
Pikvima news ; राज्यात 2023 मध्ये दुष्काळामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी यांच्याकडुन अधिसूचना काढून पिकविमा वाटपाची प्रोसेस पुर्ण केली होती. आणि आता जळगाव, नगर, नाशिक ,चंद्रपूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे वाटप सुरू केले आहे.
खरीप २०२३ हंगामात राज्यात एकूण साधारण ७६२१/- कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९/- कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७/- कोटी ची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता देण्यात आली. आजच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यामध्ये जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अशी- नाशिक ६५६/- कोटी , जळगाव ४७०/- कोटी, अहमदनगर ७१३/- कोटी, सोलापूर २.६६ कोटी सातारा २७.७३ कोटी व चंद्रपूर ५८.९० कोटी.
जिल्ह्यात पिकविमा वाटपाला सुरुवात झाली आहे. मिळाला का हे ऑनलाईन आपल्या मोबाईल वर चेक करण्यासाठी खालील संपूर्ण प्रोसेस पुर्ण करा…
पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन पद्धतीने (insurance pement status)
1) पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठी सर्वप्रथम pmfby या वेबसाईटला भेट द्या.
2) वेबसाइट उघडल्यावर पहिल्या पर्याय (farmer corner) या पर्यायावर क्लिक करा आणि (login farmer) वर क्लिक करा.
3) पुढे मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाईप करा रिक्वेस्ट otp वर क्लिक करा.
4) तुम्हाला otp येईल तो otp टाका व सबमिट करा..
त्यानंतर तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का? किती मिळाले? कोणत्या पिकासाठी किती मिळाले? आणि किती तारखेला मिळाले याची संपूर्ण माहिती दिसेल. तरी अशा पद्धतीने तुम्हाला पिकविमा मिळाला का हे ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वर चेक करु शकता.