Pm kisan 18’th instalment news ; तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नाही काय करावे…
Pm kisan 18’th instalment news ; शेतकरी मित्रांनो दि. 05/ऑक्टोबर/ 2024 रोजी 10:00 वाजता वाशीम येथुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा पाचवा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पिएम किसान योजनेचा हप्ता DBT द्वारे वितरित करण्यात आला असून आज आणि उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
पिएम किसान योजनेचा लाभासाठी बॅक खात्याला आधार लिंक आणि इ केवायसी पुर्ण असणे आवश्यक आहे. पिएम किसानचा हप्ता सकाळी 10:00 वाजता DBT द्वारे टाकले असुन हे पैसे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी 24 तासांचा आवधी लागेल असे सांगितले आहे. तुम्हाला हे पैसे जमा झाले नसतील तर काय करावे याबाबत माहिती पाहुया..
सरकारी अनुदान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ते पिकविमा तसेच पिएम किसान योजनेचा हप्ता आता आधार लिंक असलेल्या खात्यात जमा केला जात आहे. तुमच्या आधार कार्ड शी कोणती बॅंक लिंक आहे ते चेक करा. आज आम्ही उद्या पर्यंत पिएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या बॅकेत पैसे जमा झाले का चेक करा.
पिएम किसान योजनेचा हप्ता आज आणि उद्या सुद्धा जमा झाला नाही तर खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या हप्त्याबाबत विचारणा करु शकता.
जर तुमची ईकेवायसी आणि आधार लिंक पुर्ण असेल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर मेल पाठवून मदत मागू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता – 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे संपर्क केल्या वर तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.