Pm kisan news ; तरचं पिएम किसान योजनेचा लाभ मिळेल (नवीन नियम)
Pm kisan news ; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 05/ऑक्टोंबर रोजी वाशीम येथील पोहरादेवी येथुन पिएम किसान योजनेचा 18 व्या हप्त्याचे 2000 रूपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. या सोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आला. या दोन्ही योजनेचे मिळुन शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रूपये जमा झाले आहे.
पिएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. या दोन्ही योजनेचा लाभ न मिळण्याचे काय कारण असेल याबाबत अधिक माहिती या लेखात जाणून घेऊया.
पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे DBT द्वारे थेट आधार लिंक खात्यात जमा केले जातात त्यामुळे बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे. आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव्ह असने आवश्यक आहे त्याशिवाय DBT ने पैसे खात्यात जमा होत नाही.
तसेच या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 2019 पुर्वी जमीन नावावर असने आवश्यक आहे. 2019 नंतर जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येतो.
नवीन लाभार्थ्यांना पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) शेतकऱ्यांचा नवीन 7/12 उतारा
2) अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या फेरफार मध्ये मयत शेतकऱ्यांचा मृत्यू 01/फेब्रुवारी/2024 पुर्वी असेल तर तो फेरफार
3) फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल तर 2019 पूर्वी व नंतर असेल तर दोन्ही फेरफार आवश्यक.
4) पत्नी पती आणि मुलांची आधार कार्ड आणि 12 अंकी रेशन कार्ड नंबर आवश्यक.