Rain alert ; राज्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain alert ; राज्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain alert ; राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज 14/ऑक्टोंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान 36 अंशांच्या पार गेले होते. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. 13/ऑक्टोंबरच्या सकाळ पर्यंतच्या 24 तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

 

Retreat Monsoon : उत्तर भारतातून मॉन्सूनची माघार
पावसाला पोषक हवामान असल्याने आज 14/ऑक्टोंबर रोजी कोकणातील पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतल्यानंतर तब्बल आठवडाभरापासून महाराष्ट्रातील परतीची मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. 11/ऑक्टोंबर रोजी उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतली. त्यानंतर मॉन्सून ‘जैसे थे’ आहे. परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत मॉन्सूनची आणखी माघार होण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात आज 14/ऑक्टोंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Leave a Comment