Solar pump yojana मागेल त्याला सोलार पंप योजनेच्या अर्जाची नवीन ऑनलाईन नोंदणी सुरु…..
Solar pump yojana सोलार पंप योजनेच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ मिळाला आहे. सोलार पंपासाठी प्रत्येक शेतकऱ्यांची मागणी आहे. सोलार पंपाच्या साहाय्याने आपण शेताला दिवसा सिंचन करू शकतो, याशिवाय रात्री वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून जीवाला वाचवू शकतो. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागेल त्याला सोलार पंप योजनेची अंमलबजावणी केली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर सोलार पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे .
मागेल त्याला सोलार पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ घ्यायचा असेल तर, मागेल त्याला सोलार पंप योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करून सोलार पंपाचा लाभ घ्यावा.
यापूर्वी जर तुम्ही कोणत्याही सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला असेल तर, तुम्हाला मागेल त्याला सोलार पंप योजनेचा अर्ज सादर करता येणार नाही. सोलार पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या विहिरीवर कोणतेही विज कनेक्शन नसावे. तसेच त्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर विहीर किंवा बोअरवेलची नोंद असावी. मागेल त्याला सोलार पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी यापूर्वी कोणत्याही सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
मागेल त्याला सोलार पंप योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा CSC सेंटर किंवा लॅपटॉप च्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात . मागेल त्याला सोलार पंप योजनेचा अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती खालील युट्यूब व्हिडिओ YouTube video मध्ये पहा.