Soyabean Market ; तरच सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळेल बाजार तज्ञ

Soyabean Market ; तरच सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळेल बाजार तज्ञ

Soyabean Market : सध्या साेयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या खाली असून, शेतकऱ्यांना 3800 ते 4500 प्रति क्विंटल रुपयांनी साेयाबीन विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे. हा दर मिळण्यासाठी साेया ढेपेचे दर किमान 5000 रुपये असले पाहिजेत. त्यासाठी साेया ढेपेची आयात थांबवून निर्यात वाढविणे आणि निर्यातीला सबसिडी देणे गरजेचे आहे.

 

केंद्र सरकारने सन 2024-25 च्या हंगामासाठी साेयाबीनचा हमीभाव 4892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. सध्या शेतकऱ्यांना 3800 ते 4500 रुपये दराने साेयाबीन विकावे लागत असून, शेतकऱ्यांना MSP पेक्षा 400 ते 1000 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहेत. (Soyabin MSP)

 

मध्य प्रदेशातील शेतकरी साेयाबीनला किमान सहा हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी करीत आहेत. हा दर मिळण्यासाठी साेयाढेपेचे दर किमान 5000 रुपये क्विंटलपर्यंत पाेहाेचणे आवश्यक आहे. त्यासाठी साेयाढेपेची आयात थांबवून निर्यात वाढविणे आणि त्याला सबसिडी देणे आवश्यक आहे, असे मत शेतमाल बाजारतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे.

 

जागतिक बाजारात सध्या साेयाबीनचे दर 10 डाॅलर प्रति बुशेल म्हणजे 3024 रुपये प्रति क्विंटल तर साेया ढेपेचे दर 311 डाॅलर प्रति टन अर्थात 31 डाॅलर म्हणजेच 2604 रुपये प्रति क्विंटल आहे. कमी दरामुळे ढेपेची आयात वाढणार असून, देशांतर्गत बाजारातील साेयाबीनचे दर आणखी दबावात येणार आहेत. (Soyabin market news)

 

भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात साेयाबीन व ढेपेचे दर खूप कमी आहे. त्यामुळे आयातीचा धाेका वाढला आहे. खाद्यतेलावर 20 टक्के आयात शुल्क लावल्याने साेयाबीनच्या दरावर फारसा परिणाम हाेत नाही. साेयाबीनला किमान सहा हजार रुपये मिळावा, यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययाेजना करायला हव्या. विजय जावंधिया, शेतमाल बाजारतज्ज्ञ.

Leave a Comment