Soyabin Hamibhav ; हमीभावाने सोयाबीनची विक्री करण्यासाठी हे काम करावे लागणार
Soyabin Hamibhav ; केंद्र सरकारकडून सोयाबीन आणि उडीद तीन महिने नाफेड आणि NCCF च्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीन चे पडलेले दर आणि शेतकऱ्यांची मागणीनुसार सोयाबीनची तीन महिने नाफेड आणि NCCF च्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोयाबीन आणि उडीदाची राज्यातील 19 जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच NCCF च्या माध्यमातून 07 जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या खरेदी केंद्रावर 10/ऑक्टोंबर पासून मुग,उडीदाची खरेदी केली जाणार आहे तर सोयाबीनची 15/ऑक्टोंबर पासून खरेदी सुरू होणार आहे.
हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन उडीदाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार…
शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग उडीद हमीभाव खरेदीचा लाभ घेण्याचं आव्हान मार्केट फेडरेशन केलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड आणि एनसीसीएफ च्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे. (Soybean Procurement)