Soyabin market ; सोयाबीनचे बाजारभाव 5000 च्या पुढे जातील का?
Soyabin market ; देशात सोयाबीनच्या दराबाबत मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. सध्या हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे सुद्धा अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन साठी कमीत कमी 6000 रूपये दर अपेक्षित आहे यासाठी मध्यप्रदेश मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने पुढील तीन महिने 4892 या हमीभाव दराने खरेदी करण्याचे जाहीर केले आहे.
सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्कात वाढ केली आहे तसेच हमीभाव खरेदीच्या सुचना मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना दिल्या आहेत. सरकारच्या या दोन निर्णयामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळणार आहे. तरी येत्या हंगामात सोयाबीनचे बाजारभाव 5000 च्या पुढे जातील का पाहुया अभ्यासांचा अंदाज.
सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सोपाने दिलेल्या अहवालानुसार सोयाबीनचा स्टाॅक मागिल वर्षीपेक्षा 50% कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात आधीच्या हंगामातील स्टाॅक 24 लाख टन शिल्लक होता. पण मागिल वर्षभरात सोयाबीचे गाळप वाढले असून स्टाॅक कमी झालाय. त्यामुळे नव्या हंगामात सोयाबीनचा स्टाॅक गेल्या वर्षीपेक्षा 50% कमी होऊन 11 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज सोपाने दिला आहे.
पेरणी वाढली पण उत्पादकता कमी होण्याची शक्यता…
यावर्षी सोयाबीनची पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी ऑगस्ट च्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे पेरणीत वाढ झाली असली तरी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे.
परतीच्या पावसाने पुन्हा नुकसान होण्याची भीती…
सरकारी हमीभाव केंद्रावर हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू होताच सोयाबीन बाजाराला आधार मिळणार असून खुल्या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढतील. शेतकऱ्यांना 6000 रुपये दर अपेक्षित आहे. सरकारला खुल्या बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव वाढवण्यासाठी जास्तीत जास्त खरेदी करावी लागेल. जर सोयाबीनचे नुकसान वाढुन आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले तर देशातील सोयाबीनचे बाजारभाव नक्कीच वाढतील.