Soyabin news ; सोयाबीनची या 209 केंद्रावर होणार हमीभावाने खरेदी…
Soyabin news ; केंद्र सरकारकडून सोयाबीन आणि उडीद तीन महिने नाफेड आणि NCCF च्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. सोयाबीन चे पडलेले दर आणि शेतकऱ्यांची मागणीनुसार सोयाबीनची तीन महिने नाफेड आणि NCCF च्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोयाबीन आणि उडीदाची राज्यातील 19 जिल्ह्यात 19 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच NCCF च्या माध्यमातून 07 जिल्ह्यात 63 केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या खरेदी केंद्रावर 10/ऑक्टोंबर पासून मुग,उडीदाची खरेदी केली जाणार आहे तर सोयाबीनची 15/ऑक्टोंबर पासून खरेदी सुरू होणार आहे.
नाफेडचे जिल्हानिहाय खरेदी केंद्र खालील प्रमाणे आहेत.
🔵 अकोला (8)
🔵अमरावती (9)
🔵 बीड (16)
🔵 बुलढाणा (12)
🔵 धाराशिव (15)
🔵 धुळे (5)
🔵 जळगाव (14)
🔵 जालना (11)
🔵 कोल्हापूर (1)
🔵 लातूर (14)
🔵 नागपूर (8)
🔵 नंदुरबार (2)
🔵 परभणी (8)
🔵 पुणे (1)
🔵 सांगली (2)
🔵 सातारा (1)
🔵 वर्धा (8)
🔵 वाशीम (5)
🔵 यवतमाळ (7)
NCCF च्या माध्यमातून खालील जिल्ह्यातील केंद्रावर खरेदी होणार
🟣 नगर (7)
🟣 सोलापूर (11)
🟣 हिंगोली (9)
🟣 चंद्रपूर (5)
🟣 नांदेड (14)
🟣 छत्रपती संभाजीनगर (11)
शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग उडीद हमीभाव खरेदीचा लाभ घेण्याचं आव्हान मार्केट फेडरेशन केलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड आणि एनसीसीएफ च्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे. (Soybean
Procurement)