केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी सरकार तीन पर्यायांवर काम करत आहे. सरकार एकतर हमीभावाने सोयाबीन खरेदी करेल किंवा सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करेल किंवा सोयाबीन खरेदीसाठी खाजगी खरेदीदारांना 15 टक्के निधी उपलब्ध करून देईल.ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल.
सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे भाव घसरले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरही होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव 4 हजारांच्या पातळीवर आला असून सध्या सोयाबीनचा भाव ४ हजारांपेक्षा कमी झाला आहे.
Soyabin rate
सोयाबीनच्या दरावर दबाव असल्याने सरकारने हमी भावाने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोयाबीनला हमीभाव सरकार देणार असल्याची घोषणा केली आसून सोयाबीनला किमान हमी भाव मिळावा यासाठी सरकार तीन पर्यायांचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सरकार खरेदी करेल, यंदा सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. सरकारने सोयाबीन खरेदी सुरू केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि भावात सुधारणा होईल.
शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सरकार भावांतर योजनेवरही विचार करत असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळाल्यास हमी भाव आणि शेतकऱ्यांना बाजारात मिळणारा भाव यातील तफावत सरकार भरेल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सरकार आणखी एका पर्यायाचा विचार करत असून या पर्यायानुसार बाजारात खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांना हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंधनकारक असेल. या खरेदीदारांना सोयाबीन खरेदीसाठी सरकार १५ टक्के मदत करेल, असेही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.