Syclone update ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ राज्यावर काय परिणाम होणार
Syclone updates ; महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढत असले तरी पुन्हा कमी होत आहेत. हवेचे दाब आज 1010 हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण कायम राहील. सुरुवातीस गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत पाऊस कमी होईल. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरही हवेचे दाब वाढत आहेत. (हवामान तज्ञ रामचंद्र साबळे)
23/ऑक्टोंबर पासून हवेचे दाब पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पावसाचे प्रमाण कायम राहील. 23/ऑक्टोंबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळाची निर्मिती होऊन महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईशान्य मॉन्सूनचा मुक्काम राज्यात आणखी काळ वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक मॉन्सून हंगाम हा वेगवेगळा असतो. हवामान बदलाच्या प्रभावामुळे मॉन्सूनही दिवसेंदिवस प्रभावित होताना दिसून येत आहे. (हवामान तज्ञ रामचंद्र साबळे)
या वर्षीच्या खरीप हंगामात ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश गरजेपेक्षा कमी मिळाला. त्याचा विविध पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. हवामान बदलाचे परिणामप्रमाणाव शेती क्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले. काही भागात अधिक पाऊस, तर काही भागात कमी पाऊस झाल्याचे चित्र होते.
प्रशांत महासागराच्या पेरूजवळील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 16 अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ 21 अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव जाणवत असल्याचे आढळून आले. त्यामुळेही ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर पडण्यास उशीर झाल्याचे दिसून येते. (हवामान तज्ञ रामचंद्र साबळे)