Weather forecast ; आज या भागात पावसाची शक्यता – होसाळीकर

Weather forecast ; आज या भागात पावसाची शक्यता – होसाळीकर

 

 

Weather forecast ; हवामान खात्याने 20/सप्टेंबर पासून राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली असता आज वातावरणात मोठा बदल झालाय. आज (दि.20/सप्टेंबर) सकाळपासून ढगाळलेले वातावरण असुन हलक्या सरी बरसत आहे. हवामान विभागाचे संचालक डॉ के. एस. होसाळीकर यांनी आज राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलीय.

 

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वानुमाना प्रमाणे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, व विदर्भात ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे हवामान शाखेचे संचालक डॉ होसाळीकर यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे.

 

 

आज 20/सप्टेंबर रोजी IMD ने पुढील चार आठवड्याचा अंदाजा जाहीर केला आहे. या लांब पल्ल्याच्या अंदाजात आयएमडी ने 26/सप्टेंबर पासून पुढील 10 / 12 दिवस मध्य भारताच्या काही भागांत महाराष्ट्रसह, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना IMD चे हवामान अंदाज रोज पाहण्याचे अवाहन करून अंदाजानुसार शेतीच्या कामाचे नियोजन करावे असे सांगितले आहे. 

 

राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असून सध्या खरिपातील सोयाबीन आणि उडीद पिकाची काढणी सुरू आहे. हवामान विभागाने पुढे 6/7/ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे तरी शेतकऱ्यांनी पिक कापणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

 

आयएमडी ने पुढील पाच दिवसासाठी जिल्हानिहाय दिलेले ईशारे खालील नकाशा मध्ये पहा. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा तसेच शेतीविषयक महत्वाची माहिती आणि तज्ञांचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा.

 

Leave a Comment