Weather forecast ; पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
Weathar forecast ; राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पावसासाठी अनुकूल हवामान असल्याने, आज 20/ऑक्टोबर रोजी धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात वादळी पावसाची शक्यता असुन हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय आणि मान्सून परतला असला तरी राज्यात वादळी पावसाची हजेरी कायम आहे. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज 20/ऑक्टोबर रोजी धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत गारपिटीसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच कडाक्याची उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे.
20/ऑक्टोबर, पुढील 5 दिवस IMD ने आज दिलेल्या जिल्हानिहाय अलर्टमध्ये दर्शविल्यानुसार मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता हवामानाच्या तीव्रतेवर आधारित, काही जिल्ह्यांसाठी पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभाग प्रमुख – के. एस. होसाळीकर