Weather news ; पंजाबराव डख म्हणतात या भागात अतिवृष्टी होणार…

Weather news ; पंजाबराव डख म्हणतात या भागात अतिवृष्टी होणार…

Weather news ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 23/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 02/ऑक्टोंबर पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. पाहुया पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज 23/ सप्टेंबर पासून 26/सप्टेंबर पर्यंत संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मुंबई सह कोकण किनारपट्टी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे तरी नदीकाठच्या गावांना सतर्क रहावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. मान्सूनचा शेवटचा टप्पा सुरू असून या पावसात विजाचे प्रमाण खुप जास्त असते तरी सर्वानी काळजी घ्यावी.

26/सप्टेंबर पर्यंत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच सर्वत्र जोरदार पाऊस होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी दखल घ्यावी. पाऊस सुरू होताच जनावरे तसेच शेतमजुरांनी सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. पावसात विजा चमकत असताना झाडाखाली थांबु नये कारण झाडावर विजा पडण्याची शक्यता अधिक असते.

पंजाबराव डख यांनी 02/ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला 02/ऑक्टोंबर पर्यंत थांबावे. काढलेले सोयाबीन चांगले झाकुन ठेवावे. सविस्तर अंदाज YouTube video मध्ये पहा…

 

Leave a Comment