पावसाची शक्यता ; मान्सुनला परतीच्या प्रवासाला अनुकूल परिस्थिती – रामचंद्र साबळे

पावसाची शक्यता ; मान्सुनला परतीच्या प्रवासाला अनुकूल परिस्थिती – रामचंद्र साबळे

पावसाची शक्यता ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज दि. 15/सप्टेंबर रोजी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात महाराष्ट्रावर 1006 ते 1008 हेक्टापास्कल एवढे हवेचे दाब राहतील. तसेच या आठवड्यात कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहिल व उत्तर महाराष्ट्र,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा पश्चिम विदर्भ अगदी हलक्या पावसाची शक्यता असेल तर पुर्व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहिल.

 

दि. 19/सप्टेंबर ते 21/सप्टेंबर या कालावधीत हवेचे दाब 1008 हेक्टापास्कल पर्यंत वाढतील व कमाल तापमान वाढेल तसेच दुपारचे हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान किमान तापमान 20 ते 22 अंश एवढे तक्ष कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहिल त्यामुळे सकाळी हवामान थंड तर दुपारी उष्ण जाणवेल.

 

साबळे म्हणतात कि मराठवाडा आणि विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून असेल तर उर्वरित महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहिल. या आठवड्यात हवामान ढगाळ असेल तर धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 20 किमी पेक्षा जास्त असेल. (रामचंद्र साबळे जेष्ठ हवामान तज्ञ)

 

परतीचा मान्सूनचा कधी – रामचंद्र साबळे

जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानवर हवेचे दाब 1004 हेक्टापास्कल एवढे असून तेथे पाउस थांबणार आहे. वातावरण प्रणाली वाढताच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment