कापूस पातेगळ होनारचं नाही, या फवारणीने एकही पातं गळनार नाही

कापूस पातेगळ होनारचं नाही, या फवारणीने एकही पातं गळनार नाही

 

सध्या कापूस पिकामध्ये पातेगळीचे प्रमाण वाढले आहे. तर कपाशीची पातेगळ होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती आपण या लेखातून सविस्तर पाहूयात…

कापूस पातेगळ का होते ? पातेगळीचे कारणं

◆ सततच्या पावसामुळे आणि सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे कापूस पिकामध्ये पातेगळ होते…

 

◆ पावसाची दिर्घकाळ उघडीप आणि वाढेलेले तापमान आसेल तरीही पातेगळ होते….

 

◆ पावसामुळे कपाशीच्या फुलामध्ये पाणी साचुन फुलं पात्यातंच सडतात आणि त्याबरोबर बोंड खराब होते आणि ते पाते गळून जाते…

 

◆ बोंडआळी आणि ईतर किंडींचा प्रादुर्भावामुळे पातेगळ होत आसते…

 

◆ आन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कापूस पिकामध्ये पातेगळ होते…

 

पातेगळ होऊ नये यासाठी हे करा…

 

१) फवारणीतुन योग्य वेळी योग्य विद्राव्य खतांचा वापर करावा…

 

२) पाण्याचा ताण बसत आसेल तर पाणी द्यावे..

 

३) योग्य वेळी किड नियंत्रण करावे…

 

४) कपाशीला नत्रयुक्त खतांचा वापर आंतर आणि वाढीनुसार करावा,जेने करून दाटी होनार नाही, जास्त दाटी झाल्यास पातेगळ होते…

 

 

पातेगळ होत आसेल तर ही फवारणी करा👇👇

 

पाते,फुलांच्या आवस्थेत कपाशीला 13.00.45 या विद्राव्य खताचा फवारणीतुन वापर करायला पाहिजे, सोबतच पाऊस चालू आसेल तर बावीस्टीन किंवा अँन्ट्राकाँल या बुरशीनाशकाची फवारणी करावी..सोबत किडींच्या प्रादुर्भावानुसार किटनाशक घ्यावे…

 

पातेगळ जास्त प्रमाणात होत आसेल तर प्लँनोफिक्स आणि चिलेटेड बोराँन किंवा 13.00.45 ची फवारणी घ्यावी…

Leave a Comment