लाडकी बहिण योजना ; या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही, नवीन नियम लागू… 

लाडकी बहिण योजना ; या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही, नवीन नियम लागू… 


लाडकी बहिण योजना ; लाडकी बहिण योजनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. या योजनेसु आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचे अर्ज केले आहे. तसेच 1 कोटी 65 लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेचे दोन महिन्याचे मिळुन 3000 रुपये खात्यात जमा झाले आहे. आणि 30/सप्टेंबर पर्यंत महिलांना अंगणवाडी सेविका कडे नवीन अर्ज करता येणार आहे.

 

लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक नवनवीन गैर व्यवहार आणि डुप्लिकेट कागदपत्रे अपलोड करुन अर्ज भरल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे सरकारने सर्व कागदपत्रांची परत एकदा छाननी करून जे बनावट म्हणजे खोटे कागदपत्रे जोडून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत असे लाभार्थी या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेतुन कोणत्या महिला अपात्र होणार तसेच यामध्ये कोणता नवीन नियम लागू केला याबाबत माहिती पाहूया.

लाडकी बहिण योजनेमध्ये खालील प्रमाणे केलेल्या महिलांचे पुढील हप्ते कायमचे बंद होणार

1) लाडकी बहिण योजनेमध्ये अनेक महिलांनी डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून अर्ज भरले आहेत तरी डुप्लिकेट कागदपत्रे सादर करून केलेले अर्ज कायमचे बाद होणार आहे.

2) एकाच महिलांचा दोन वेळा फार्म भरलेल्या असेल तर हे अर्ज सुद्धा बाद केले जाणार आहे. कागदपत्रांत थोडा बदल करून अनेक महिलांनी दोन वेळा फार्म भरले आहेत.

3) अनेक महिलांना पिएम किसान, नमो शेतकरी यासारख्या योजनांचा लाभ मिळत आहे. पिएम किसान, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र होतील असे सांगितले आहे परंतु ज्या महिला निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महिला लाडकी बहिण योजनेतुन बाद होणार आहे.

4) ज्या महिलांनी अर्ज करताना बॅंकेचे ज्वाईंड खाते क्रमांक दिला आहे अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही तरी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडा त्यानंतर योजनेचा लाभ मिळेल.

वरील प्रमाणे शासनाने लागू केलेल्या नियमावली विरुद्ध जर महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना अर्जाची छाननी पुर्ण झाल्यावर येणारा हप्ता बंद होणार आहे. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

 

Leave a Comment