लाडकी बहिण योजनेला ब्रेक ; योजनेला ब्रेक का दिला पहा सविस्तर
Ladki bahin yojna : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना गेल्या तीन चार महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा मुद्दा झाला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबण्याची नोटीस काढली होती. निवडणुक आयोगाने दिलेल्या नोटीसा नुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला ब्रेक दिला आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची पुढील कारवाई निवडणुका पार पडल्यानंतर आणि आचारसंहिता उठवल्यानंतर घेतला जाईल.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रूपये महिलांना थेट खात्यावर दिले जातात. आर्थिक लाभ देऊन मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना थांबण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे मोठ्या चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना थांबवण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत याची माहिती मागवली होती. यावेळी महिला व बालकल्याण विभागाची लाडकी बहिण योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याने ही योजना विभागाला तुर्तास थांबविण्याचा आदेश देण्यात आले होते. याप्रमाणे ही योजना तुर्तास थांबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
सरकारने आचारसंहिता कधीही लागू होईल असा विचार करून 15/ऑक्टोंबर आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा झाला आहे. तर वेळेअभावी 10 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होवू शकले नाहीत, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.