लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर तरीही पैसे मिळाले नाही काय करावे
लाडकी बहिण योजना ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यापासून सर्वाधिक लोकप्रिय तसेच चर्चेचा विषय झाला आहे. योजनेच्या घोषणेनंतर सर्व महिलांमध्ये लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू झाली त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव तसेच अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांब लांब रांगा पहायला मिळाल्या.
कागदपत्रे आणि योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने सुधारित शासन निर्णय (GR) काढून अनेक सुटी सवलती जाहीर केल्या तसेच योजनेत तीन चार वेळा महत्त्वाचे बदल केले आहे. योजनेत बरेचसे बदल झाल्यानंतर महिलांना लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता आले. महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पात्र महिलांना अर्ज मंजूर होऊन त्यांना 7500 रूपयाचा लाभ सुद्धा मिळाला आहे.
लाडकी बहिण योजनेत अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाही तरी याचे काय कारणे आहेत तसेच योजनेचा लाभ मिळाला नसल्यास महिलांनी काय करावे पाहुया.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर असून 7500 रूपये का आले नाही
1) लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर आहे तरीसुद्धा पैसे न मिळण्याचे पहिले कारण आहे की तुमच्या बॅंकेला आधार लिंक नसेल.
2) तसेच आधार लिंक आहे परंतु आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने सुद्धा अर्ज मंजूर असून लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाही.
3) बॅक खात्याच्या संबंधित इतर कारणास्तव बॅक खाते होल्ड होणे किंवा ईकेवायसी करावी लागत असेल किंवा कर्ज खाते असल्यास रक्कम कर्जातून कपात केली असण्याची शक्यता आहे.
4) अनेक महिलांना आधार लिंक बॅक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत आणि महिला अर्ज करतेवेळी दिलेल्या बॅक खात्यात पैसे जमा झाले का चेक करत आहेत तरी तुमच्या बॅक खात्याशी कोणती बॅक लिंक आहे चेक करा.
5) अनेक महिलांचे दोन किंवा तीन बॅंकेत खाते आहे ज्या बॅंकेला आधार लिंक आहे त्या बॅंकेत पैसे जमा झाले आहेत का चेक करा.
6) जर तुमचा अर्ज उशीरा मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल
महिलांनी काय करावे…
1) आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे का चेक करा.
2) आधार सिडिंग स्टेट्स कोणत्या बॅकेचे लिंक आहे चेक करा.
3) बॅकेचे इतर काही अडचणी असल्यास दुरुस्ती करावी.