सध्या सोयाबीनला मिळनारा भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही अशी परिस्थिती आहे. 4000 च्या भावाने सोयाबीन पिकातून किती फायदा आणि किती तोटा याची माहिती या लेखातून तुम्हाला मिळेल….आवडल्यास शेयर नक्की करा🙏
सोयाबीन पिकासाठी होनारा एकरी खर्च 👇👇
◆ पुर्वमशागत/नांगरणी/रोटावेटर/पेरणी कमीत कमी ; 5 हजार रूपये
◆ बियाणे ; 3 हजार रूपये
◆ रासायनिक खते ; एकरी 2 बँग जरी पकडल्या तर 3-4 हजार रूपये
◆ उगवणपूर्व तननाशक/फवारणी ; 1000 रुपये
◆ 21 दिवसांत तननाशक ; 1000 रूपये
◆ तीन फवारण्या ; 3 हजार रूपये
◆ कापनी ; 5 हजार रूपये
★ एकून खर्च ; 24000 रूपये
शेतकऱ्यांना सरासरी एकरी उत्पादन किती होते ?
सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांन सरासरी 7-8 क्विंटल चा उतार मिळतो. आतीव्रुषी/कमी पाऊस किंवा ईतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास एवढेही मिळत नाही. आगदी तुरळकच शेतकऱ्यांना 10+ चा उतार मिळतो…भारतातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन हे 7-8 क्विंटल दरम्यानच आहे.
मग फायदा झाला की तोटा ?
सध्या सोयाबीनला 4 हजार रूपये भाव मिळतोय, मग 7 क्विंटल चे 28000 रूपये होतात. त्यात एकरी उत्पादनखर्च 24000 रूपये आहे.
28000 – 24000 = 4000
खरंतर आनखी छोटाछोटा खर्च धरला तर उरलेले 4 हजारही पुरत नाहीत, मग नाही का सोयाबीन उत्पादक शेतकरी तोट्यात ?
ईतर देशात सोयाबीनचे उत्पादन भारतातील उत्पादनापेक्षा दुप्पट ते तीप्पट आहे. भारतातील उत्पादन ब्राझील, अर्जेंटिना, चिन या देशाच्या तुलनेत खुप कमी आहे. उत्पादन खर्च वाढले आसून भाव कमी झाले आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी तोट्यात जात आहेत.
सरकारने ठरवलेल्या हमीभावाने खरेदी होत नसल्याने सोयाबीन उत्पादक नाराजी व्यक्त करत आहेत… सरकारने हमीभावाने खरेदी करावी किंवा भावांतर योजना आनावी किंवा शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल बोनस स्वरूपात दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.