कर्जमाफी 2024 ; निवडणुकाआगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?
कर्जमाफी 2024 – गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची चर्चा रंगत असून, थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होणार का? आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही याबद्दल सविस्तर माहिती या लेखातून पाहूयात….
लोकसभा निवडणुकीत महायुतीलाचा मोठा फटका बसल्याने आणि कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आसल्याने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारने गोळा करण्यास सुरुवात केल्याचे ऐकायला मिळत आहे.
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची 31 हजार कोटींची कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, त्यामुळे तेलंगणातील कर्जमाफीप्रमाणेच महाराष्ट्रातही कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
एकीकडे विधानसभा निवडणूक, दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आणि विरोधी पक्षांची मागणी यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे, त्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले असून, माहिती गोळा करण्याचे कामही सुरू आहे, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी फारच कमी दिवस शिल्लक असून त्यानंतर राज्यभरात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकाआगोदर कर्जमाफीची फक्त घोषणा होऊ शकते आणि घोषणा म्हणजे कर्जमाफी होत नाही. कर्जमाफीसाठी पुरवनी मागण्या अगोदर कराव्या लागतात आणि त्यासाठी अधिवेशन घ्यावे लागते. आणि अधिवेशन निवडणुकीनंतरच होणार असल्याने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफी शक्य नाही.
राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, असे शेतकऱ्यांना वाटत असले तरी कर्जमाफी करायचीच होती तर अधिवेशनातच जाहीर करायला हवी होती. या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.