परतीच्या पावसाला उशीर होनार रामचंद्र साबळे यांचा अंदाज

परतीच्या पावसाला उशीर

जेष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी परतीच्या पावसाबाबत दिलेली महत्त्वाची माहिती या पोष्टमध्ये आपण सविस्तर पाहुयात…

परतीचा मॉन्सून सुरू होण्यास वेळ लागेल, कारण शनिवार (ता. १३) पर्यंत राजस्थानवरील तापमान कमी राहण्यामुळे हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके कमी राहील. हवेचे दाब कमी राहील्याने यामुळे तेथे पाऊस सुरूच राहील.

जोपर्यंत राजस्थानमध्ये पाऊस थांबत नाही व हवेच्या दाबात वाढ होत नाही, तोपर्यंत परतीचा मॉन्सून सुरू होणार नाही. त्यामुळे परतीचा मान्सून सुरु होन्यासाठि आनखी वेळ आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

परतीच्या पावसाला उशीर, या आठवड्यात हवामान कसे राहील ; रामचंद्र साबळे

कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील भंडारा, गोंदिया व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैरूत्येकडून राहनार आहे.. म्हणजेच नैरूत्य मॉन्सून याही आठवड्यात सक्रिय राहील.

विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहनार आसून धाराशिव, बीड, नगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २४ कि.मी. राहील. या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे काही काळ पावसात उघडीप व सूर्यप्रकाश राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी जाहीर केला आहे.

Leave a Comment