Soyabin rate ; यंदा सोयाबीनचे भाव कसे राहतील,पहा सविस्तर…

Soyabin rate ; यंदा सोयाबीनचे भाव कसे राहतील,पहा सविस्तर…

Soyabin rate ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हनजे येत्या तीन महिन्यांसाठी सोयाबीन आणि उडदाची हमीभावाने खरेदी केली जानार आहे, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. यापूर्वी केंद्रीय कृषी विभागाने महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हमी भावाने सोयाबीन खरेदीला मान्यता दिली होती. त्यानुसार नाफेड आणि एनसीसीएलला सूचना देण्यात आल्या आहेत.

येत्या तीन महिन्यांत राज्यात सोयाबीनसह उडदाची हमी भावाने खरेदी केली जाईल. सोयाबीनचा हमी भाव ₹4892 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.

2023 मध्ये सोयाबीनच्या विक्रीदरम्यान शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते आता शेतकऱ्यांना हमी भावाने सोयाबीन विकण्याची संधी मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात विकण्याची वेळ येणार नाही.

Soyabin rate ; धनंजय मुंडे यांनी सोयाबीन निर्यातीसाठी ५० डॉलरचे अनुदान देण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली आहे. या प्रस्तावावरही लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, त्याचा फायदा सोयाबीन शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य दर मिळणे शक्य झाले आहे.

Leave a Comment