पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा – पुन्हा मुसळधार…
पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 14/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. या अंदाजा मध्ये त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार आणखी पाच दिवस राज्यात पाऊस उघडीप देणार आहे आणि पुन्हा 20/सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाहुया सविस्तर हवामान अंदाज.
20/सप्टेंबर पासून सर्वत्र जोरदार पाऊस – पंजाबराव डख
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20/सप्टेंबर पासून ते 02/ऑक्टोंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तरी काढणीला आलेले सोयाबीन काढून चांगले झाकुन ठेवावे असे डख यांनी सांगितले आहे. सोयाबीन काढणीसाठी 20/सप्टेंबर पर्यंत अनुकूल परिस्थिती आहे.
राज्यात 23/सप्टेंबर 25/सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडेल तसेच पुढच्या महिन्यात 07/ऑक्टोंबर 08/ऑक्टोंबर आणि 09/ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा अंदाज असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. तरी शेतकऱ्यांनी शेतातील कामाचे नियोजन पावसाचे वातावरण पाहुन करावे म्हणजे नुकसान टाळता येईल.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस – पंजाबराव डख
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मालेगाव, आणि संभाजीनगर तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, आणि वाशिम या जिल्ह्यात पावसाचा जोर असेल.
शेतकऱ्यांनी 20/सप्टेंबर पर्यंत काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी तसेच 21/सप्टेंबर पासून सोयाबीन काढली ला थांबावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजाचा YouTube video खाली पहा.