Monsoon return ; परतीच्या पावसाचा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव डख लाईव्ह…

Monsoon return ; परतीच्या पावसाचा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव डख लाईव्ह…

Monsoon return ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 13/ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजा मध्ये डख यांनी परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज पाहुया.

पंजाबराव डख यांनी सांगितले की मान्सुनने परत फिरण्याची तयारी सुरु केली असून महाराष्ट्रातून वरुणराजा दि. 21/ऑक्टोबर पर्यंत निघून जाईल. या दरम्यान ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 05/ नोव्हेंबर दरम्यान राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरूवात होईल असेही डख यांनी सांगितले आहे.

 

दि. 18/ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जळगाव कडून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेला मान्सून माघारी परतणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज पासून पुढील सहा दिवस म्हणजेच 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 05/ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या पेरणीचे नियोजन वापसा आणि पावसाचा अंदाज पाहुन करावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

 

 

Leave a Comment