Cotton News ; देशात कापसाची किती आवक सुरू आणि किती बाजारभाव मिळतोय

  1. Cotton News ; देशात कापसाची किती आवक सुरू आणि किती बाजारभाव मिळतोय

Cotton News : देशातील बाजारात सध्या दररोज 30 ते 35 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ही आवक कमी आहे. बाजारातील आवक कमी असल्यामुळे कापसाच्या दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. (Cotton rates 2024)

गेल्या वर्षी देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीला रोज 6000 ते 7000 गाठींच्या कापसाची आवक होती. मात्र यंदा ही आवक कमी आहे, कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडील राज्यात घटली आहे. सध्या उत्तरेकडील राज्यात कापसाची आवक आहे तसेच राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशात कापूस वेचणी सुरू झाली आहे. यामुळे कापूस आवक कमी आहे. पुढील 10 ते 15 दिवसांनंतर 50,000 ते 55,000 क्विंटल कापसाची आवक होईल. तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी वाढ होईल. (Cotton News India Today)

राज्यातील खानदेशसह इतर भागांत अजून कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी सुरू झालेली नाही. कापसाचे दर राज्यातील आणि इतर राज्यातील वेगवेगळे आहेत. खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रतिक्विंटल 8100 रुपये दर आहे. तर नव्या कापसाची खरेदी 7500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय. (Maharashtra cotton news 2024)

सध्या शेतकऱ्यांकडील साठा कमी असल्याने देशात कापसाची आवक रखडत सुरू आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे अजून कापूस साठविण्यास सुरुवात झालेली नाही. तसेच अतिपावसात महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशात कापसाची हानी झाली आहे. कोरडवाहू आणि नदीकाठच्या कापसाची उत्पादकता खूपच घटलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडील अधिकचा साठा आणि अधिक आवकेने दरांवरील दबाव हा मुद्दा यंदाच्या बाजारासंबंधी फारसा चर्चेत राहणार नाही, असेही जाणकार सांगत आहेत. (Cotton news)

Leave a Comment