Crop insurance 2024 ; या जिल्ह्याचा 25% अग्रिम पिक विमा मंजूर

Crop insurance 2024 ; या जिल्ह्याचा 25% अग्रिम पिक विमा मंजूर…

Crop insurance 2024 ; यंदा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात ढगफुटी झाली तर काही जिल्ह्यात वारे आणि जोरदार पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करणे सुरू आहे.

अतिवृष्टीने मोठा फटका बसलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळात 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने वेगवेगळ्या गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली असता 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले निदर्शनास आले आहे.

नुकसानीची पाहणी करून 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले पाहता हिंगोली जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळासाठी 25% अग्रीम पिक विमा मंजूर केला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपुर्त केला आहे.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी अभीनव गोयल यांनी 25% अग्रीम पिकविम्यासाठी अधिसूचना काढली आहे. जिल्ह्यात तुर, कापूस, बाजरी, मुग, उडीद, सोयाबीन या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन पिकांसाठी 25% अग्रीम पिकविम्यासाठी अधिसूचना काढली आहे.

 

 

सोयाबीनच्या अग्रीम पिकविम्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पात्र होतील आणि या 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयापर्यंत पिक विमा वाटप केला जाईल अशी शक्यता आहे.

राज्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. जसे इतर जिल्ह्याची माहिती मिळेल तसेच त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू तरी अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आऐ whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा…

 

 

Leave a Comment