NSMNY update शेतकऱ्यांच्या खात्यात पिएम किसान नमो शेतकरी योजनेचे 4000 रूपये जमा
NSMNY update देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशीम येथील पोहरादेवी येथून पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता DBT द्वारे वितरण करण्यात आले.पंतप्रधान मोदीं यांनी या कार्यक्रमात बटन दाबत पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.
18 व्या हप्त्यासाठी 20 हजार कोटींचा निधी केंद्राने दिला असून नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचे दोन हजार रूपये सुद्धा DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेचे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा झाले आहे.
या दोन्ही योजनेचे हप्ते वितरणावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री संजय राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तरी एक दोन दिवसांत तुम्हाला या दोन्ही योजनेचे मिळुन 4000 रूपये आधार लिंक खात्यात जमा होतील.
या दोन्ही योजनेच्या लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने , बॅंक खात्याला आधार लिंक असने अतिशय महत्त्वाचे आहे. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही.